ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ

शहर : मुंबई

कामोठे परिसरातील होम क्वारन्टाईन (केलेले रहिवासी घराबाहेर पडून फिरताना दिसत आहेत. घरातील तिघेही जण बाहेर येऊन फिरत असल्याने, परिसरात धास्ती आहे. कामोठे परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा संभव असल्यामुळे, पनवेल महानगरपालिका प्रशासनाने या कुटुंबातील तिन्ही सदस्यांना होम क्वारन्टाईन म्हणजेच घरी राहण्यास सांगितले होते.

कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्या सदस्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, खुद्द पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींच्या घरात जाऊन झडती घेण्याचे कार्य करत आहेत. आज पोलिसांना घेऊन मनपा आयुक्तांनी घरातील सदस्यांना अचानक भेट दिली होती, पण सदस्यच घरी नसल्याने मोठा गोंधळ झाला. या तिन्ही दोषी सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

                                             

मागे

नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे - देवेंद्र फडणवीस
नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे - देवेंद्र फडणवीस

कोरोना व्हायरस ही देशावर आलेली आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्....

अधिक वाचा

पुढे  

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 292 वर, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण?
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 292 वर, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण?

चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जावून पोह....

Read more