ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘हर-हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात 6 महिन्यांनी उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘हर-हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात 6 महिन्यांनी उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे

शहर : dehradun

डेहारडूनमधील केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी आज पहाटे उघडण्यात आला आहे. वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात पहाटे 5 वाजून 33 मिनिटांनी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर हजारो भक्तांनी प्रचंड थंड वातावरणातही हर-हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषात केदारनाथाचे दर्शन घेतले. मंदिराचे दरवाजे उघडण्याअगोदर मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीमाशंकर लिंग यांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात विधिवत पूजा अर्चा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक तसेच रुद्राभिषेक करण्यात आला. राज्य सरकारकडून केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार हे विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य तसेच माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही पहिल्याच दिवशी केदारनाथाचे दर्शन घेतले. यावेळी देश - विदेशातील जवळपास अडीच हजार भाविक अपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून  परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मागे

देशात मद्यपानाच्या प्रमाणात 17 वर्षांत 38 % वाढ
देशात मद्यपानाच्या प्रमाणात 17 वर्षांत 38 % वाढ

1990 मध्ये एक माणूस वर्षाला सरासरी 4.3 लीटर मद्याचे सेवन करत होता तर, 2017 मध्ये हाच ....

अधिक वाचा

पुढे  

300 किलोवरून थेट 86 किलो, सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
300 किलोवरून थेट 86 किलो, सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

आशियातील सर्वाधिक 300 किलो वजनाच्या महिलेने आपले वजन 86 किलोपर्यंत कमी केले आह....

Read more