ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिव्यांग मुलांना गळ्यापर्यंत पुरून ठेवले

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिव्यांग मुलांना गळ्यापर्यंत पुरून ठेवले

शहर : देश

           ग्रहण विज्ञानाचा भाग आहे. पण आजही आपल्या देशाच्या काही भागांमध्ये ग्रहण काळात अंधश्रद्धा पाळल्या जातात. या अंधश्रद्धा इतक्या विश्वासाने पाळल्या जातात की, प्रसंगी प्राणही धोक्यात घालण्यास माणसे मागेपुढे पाहत नाहीत. कर्नाटकमध्ये याचे धक्कादायक उदहारण समोर आले आहे.


        कर्नाटकाच्या कालाबुर्गी जिल्ह्यातील ताजसुल्तानपूर गावामध्ये सुर्य ग्रहणाच्यावेळी तीन दिव्यांग मुलांना मानेपर्यंत मातीमध्ये पुरण्यात आले होते. ग्रहण काळात मुलांना मानेपर्यंत मातीमध्ये पुरल्यास ते पूर्णपणे व्याधी मुक्त होतील या अंधविश्वासापोटी ही कृती करण्यात आली. महत्वाचं म्हणजे या दिव्यांग मुलांच्या आई-वडिलांची सुद्धा संमती होती. जवळपास दोन तास ही मुले मातीमध्ये होती. सुर्यग्रहण संपल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.


      जानावाडी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या अश्विनी यांना सर्वप्रथम मुलांना मातीमध्ये पुरल्याची माहिती मिळाली. गावातील नागरिकांकडूनच त्यांना समजले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. माजी आमदार बी.आर.पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांना विनंती केली. सुर्यग्रहणाला भारतात धार्मिक महत्व आहे. अनेक ठिकाणी ग्रहणकाळात प्रार्थना केल्या जातात.

मागे

कोल्हापूरसह मुंबईतही मटणाचे दर वाढले  
कोल्हापूरसह मुंबईतही मटणाचे दर वाढले  

        मुंबई - कोल्हापरापाठोपाठ आता मुंबईतही मटणाचे दर कडाडले असून इथे ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांच्या 'नो पार्किंग' दंडात कमालीची कपात
मुंबईकरांच्या 'नो पार्किंग' दंडात कमालीची कपात

      मुंबई - मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत नो पार्किं....

Read more