By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संकटाच्या काळात आपले प्राण गमावलेल्या दोन कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. यात कोरोना योद्धा राज कुमार आणि ओमपाल सिंह यांचा समावेश आहे. यातील एक कोरोना योद्धा हा रुग्णालयात सुरक्षारक्षक होता तर एक जण शाळेचे मुख्याध्यापक होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.(Kejriwal govt helps Rs 1 crore each to families of Corona warriors who lost their lives)
“आमच्या कोरोना योद्धांनी जिवावर उदार होत लोकांची सेवा केली आहे. सुरक्षारक्षक राज कुमार आणि शाळेचे मुख्याध्यापक ओमपाल यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं होतं. आज दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा धनादेश सोपवला. भविष्यातही या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहू”, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
हमारे कोरोना योद्धाओं ने अपनी जान पर खेल कर लोगों की सेवा की है। सिक्योरिटी गार्ड राज कुमार जी और स्कूल प्रिंसिपल ओमपाल जी का भी कोरोना संक्रमण की वजह से निधन हो गया था।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 18, 2021
आज दोनों परिवारों से मिला, 1-1 करोड़ की सम्मान राशि का चेक सौंपा। भविष्य में भी परिवारों के साथ खड़े रहेंगे। pic.twitter.com/5i6EfqaOSY
मिळालेल्या माहितीनुसार राज कुमार हे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर इथं सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तर ओमपाल सिंह हे कल्याणपुरी इथे बॉईज सिनियर सेकंडरी शाळेत मुख्याध्यापक होते.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताला पाहायला मिळत आहे. विदर्भासह मुंबई आणि मराठवाड्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध लावायला आता सुरुवात झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये इमारतींना सील करण्यापासून अनेक गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहता या गाईडलाईन्स महत्त्वाच्या आहेत.
मुंबईत कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स नेमक्या काय?
अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंता....
अधिक वाचा