By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 26, 2020 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईच्या केईएम रुग्णालयात शनिवारपासून कोविशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. कोव्हिशिल्ड लशीची ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे. आज केईएम रुग्णालयातील तिघांना ही लस टोचली जाईल. काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयातील कोविशिल्ड लशीच्या चाचणीसाठी एथिक कमिटीने मान्यता दिली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ स्वयंसेवकांच्या स्क्रीनिंगला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत लस घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या १३ स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून १० जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. आजदेखील आणखी १० जणांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. केईएम रुग्णालयात एकूम १०० जणांवर कोव्हिशिल्ड लसीची चाचणी केली जाणार आहे.तर आरटीपीसीआर आणि अँटिबॉडीज चाचणी निगेटिव्ह आलेल्या तीन स्वयंसेवकांना आज लस टोचण्यात येईल. लस दिल्यानंतर तिघांवर काही परिणाम होतो का, हे तपासले जाईल. एक महिन्यांने पुन्हा लसीचा दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
मुंबईत गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. कोरोना संसर्गाचा ६० वर्षांवरील व्यक्तींना धोका असल्याचे सांगितले जात असले तरी मुंबईत एकूण मृतांमध्ये ५० ते ५९ वयोगटातील जवळपास २३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण ६० ते ६९ वयोगटात नोंदले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या पत्रकार परिषदेत चक्क कोरोन....
अधिक वाचा