By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने आरडा-ओरडा, किंकाळ्यांचा एकच आवाज झाला. रक्ताने भिजलेले कपडे, घाबरुन गेलेल्या रडणाऱ्या बाळांचा आवाज आणि रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने परिसराने हादरवून सोडले. शुक्रवारी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या (Kozhikode) हवाई पट्टीतून खाली कोसळले आणि दरीत पडले. या विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यासह बचावकर्त्यांनी पावसाच्या दरम्यान जखमी प्रवाशांना विमानामधून बाहेर काढले. मोठा आवाज होत या विमानाचे दोन मोठे तुकडे झाले आणि एका क्षणात काय घडले हे प्रवाशांना समजू शकले नाही. एकदम ओरडण्याचा आवाज ऐकू आला. या अपघातात को-पायलटअखिलेश कुमार आणि दीपक वसंत साठे या पायलटचा मृत्यू झाला.
Death toll in Kerala plane crash rises to 17; 2 pilots dead, all 4 crew members safe: Air India Express
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2020
Read @ANI Story | https://t.co/afFVrCeQxe pic.twitter.com/nNQINNR0Ul
दरम्यान, मदत आणि बचावकर्त्यांना चार ते पाच वर्षांची मुले आपल्या आई-वडिलांच्या मांडीवर चिकटून बसताना दिसली आणि प्रवाशांचे सर्व सामान येथे विखुरलेले होते. हे दृश्य मनहेलावून टाकणारे होते. मोठा आवाज ऐकताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले.
#WATCH Kerala: Dubai-Kozhikode Air India flight (IX-1344) that skidded during landing at Karipur Airport. (earlier visuals)
— ANI (@ANI) August 7, 2020
The flight was carrying 190 people; injured shifted to hospitals in Malappuram & Kozhikode. Death toll in the flight crash landing incident is at 16. pic.twitter.com/ZrDQDjfOSg
एका स्थानिक व्यक्तीने सांगितले, तो मोठा आवाज ऐकून विमानतळाच्या दिशेने पळाला. लहान मुले सीट खाली अडकली, बरेच लोक जखमी झाले आणि ते खूप वाईट होते. अंगावर काटा आणणारा तो प्रसंग होता. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बर्याच लोकांचे पाय तुटले होते, माझे हात आणि कपडे जखमींच्या रक्ताने डागालले होते. मोठा आवाज ऐकताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले.
Kerala: Minister of State for External Affairs V Muraleedharan reaches #Kozhikode where Air India flight (IX-1344) crash-landed yesterday.
— ANI (@ANI) August 8, 2020
17 people including two pilots have lost their lives in the incident. Injured are admitted to hospitals in Malappuram & Kozhikode. pic.twitter.com/DimUR6tAhU
बचाव कार्यात सहभागी असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की, "जखमी पायलटला कॉकपिट तोडून विमानाबाहेर काढण्यात आले." अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली तेव्हा लोकांनी कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मोटारीने प्रवाशांची वाहतूक सुरु केली.
शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरल्यानंतर दुबईहून ये....
अधिक वाचा