By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरल्यानंतर दुबईहून येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. विमानाने दोन भाग झाले. ज्यामध्ये वैमानिक आणि सह-वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला.
दोन्ही वैमानिकांनी कोझिकोड दुर्घटना टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु विमान अपघातातून वाचू शकले नाही. कॅप्टन अखिलेश आणि दीपक साठे हे दोघांनी ही या अपघातात प्राण गमावला. हे दोघेही देशातील उत्कृष्ट वैमानिक होते.या अपघातात मृत्यू झालेल्यां लोकांमध्ये पायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्याचा सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमार हेही आहेत. दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते.
कोझिकोड येथे झालेल्या अपघातात देशाने दोन शूर पायलट गमवले. अपघातात 59 वर्षीय दीपक वसंत साठे आणि 33 वर्षीय कॅप्टन अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला. दीपक साठे यांची गणना देशातील सर्वोत्तम वैमानिकांमध्ये केली जाते.
हवाई दलाचा अनुभव आणि कार्यक्षम विमानप्रवासाच्या अनुभवावरुन दीपक यांनी कोझिकोड विमानतळावर विमानाला वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने विमानाला आग लागली नाही. ज्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.
#WATCH Latest visuals from Kozhikode International Airport in Karipur, Kerala where an #AirIndiaExpress flight crash-landed yesterday.
— ANI (@ANI) August 8, 2020
18 people, including two pilots, have lost their lives in the incident. pic.twitter.com/r1YRiIkbrM
एअर इंडियासाठी काम करणारे दीपक हे एकेकाळी हवाई दल अकादमीचे बेस्ट कॅडेट म्हणून ओळखले जात होते. दीपक साठे यांनाही त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर वायुसेना अकादमीकडून प्रतिष्ठित 'स्वर्ड ऑफ ऑनर' पुरस्कार मिळाला होता. हवाई दलाच्या नोकरीनंतर दीपक एअर इंडियाच्या व्यावसायिक सेवेत रुजू झाले. पायलट दीपक साठे यांचे वडील सैन्यात ब्रिगेडियर होते. त्याच वेळी त्यांचा एक भाऊ कारगिल युद्धात शहीद झाला होता.
एअर इंडियाचे एअरबस 310 विमान आणि बोईंग 737 अशी विमानं उड्डाण करणारे दीपक साठे हे देशातील मोजके पायलटांपैकी एक होते. कोझिकोड अपघातामुळे देशाने दोन सर्वोत्कृष्ट पायलट गमावले.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ ....
अधिक वाचा