ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडचिरोलीमध्ये बालसेना बसस्थानकांच्या स्वच्छेता मोहिमेवर 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 07:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गडचिरोलीमध्ये बालसेना बसस्थानकांच्या स्वच्छेता मोहिमेवर 

शहर : गडचिरोली

गडचिरोलीमधील मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र गोमनी ग्रामपंचायतीचे बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत होते. सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढला असून प्रवासी घाणीपायी बसस्थानकात बसत नव्हते. बसस्थानकालगतच्या पानटपरीवर बसून बसची प्रतिक्षा करीत असत.
ही बाब गावकर्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक नवीच गांधीगिरी अमलात आणली. गावातील चिमुकल्यांना हाताशी धरले आणि शुक्रवारी सकाळपासून ही बालसेना बसस्थानकाच्या स्वच्छतामोहिमेवर लागली. पाहता पाहता त्यांनी स्थानकाची व परिसराची साफसफाई करून त्याला चक्क केले. या लहान मुलांना गावकजयांकडून शाबासकी तर मिळते आहेच पण त्यांनाही आपण भलेमोठे बस स्थानक स्वच्छ केले याचाही आनंद मिळतो आहे. याचसोबत गोमनी ग्रामपंचायतीच्या डोळ्यात या निमित्ताने अंजन पडले आहे.

मागे

जेट कर्मचार्‍यांचा न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च
जेट कर्मचार्‍यांचा न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

मुंबईत जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचार्‍यांचा तिढा सुटण्याची क....

अधिक वाचा

पुढे  

नालासोपारामध्ये विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू
नालासोपारामध्ये विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे यथील आनंद व्ह्यू या इमारतीत ही दुर्घटना घ....

Read more