By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सरकारी, खासगी नोकरदार वर्गाचा पीएफ (PF) म्हणजेच एंप्लॉई प्रॉव्हिडंट फंड अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी महिन्याच्या पगारातून पीएफ अकाऊंटमध्ये जमा केला जातो. सर्वसाधारणपणे पगाराच्या १२ टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होते. पीएफ खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते. ८.६५ टक्के दराने पीएफ खात्यात व्याज जमा होते. अनेकांना पीएफचे इतर काही फायद्यांबाबतची माहिती नसते. जाणून घ्या पीएफचे पाच फायदे...
विमा -
अनेकांना याबाबत माहिती नसते की, त्यांच्या पीएफ खात्यावर बाय डिफॉल्ट विमा मिळतो. EDLI (एम्प्लॉइ डिपॉजिट लिंक्ड इन्शोरन्स) योजनेअंतर्गत ६ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. या योजनेतून खातेधारकांना लमसम रक्कम मिळते. याचा फायदा आजारी पडल्यास, अपघात किंवा मृत्यू झाल्यास मिळतो.
निवृत्तीनंतर पेन्शन -
खातेधारक सलग १० वर्षांपर्यंत नोकरी करत असेल आणि त्याच्या पीएफ खात्यात एक रक्कम जमा होत असेल, तर खातेधारकाला एम्प्लॉई पेन्शन स्किमचा फायदा मिळतो. एम्प्लॉई पेन्शन स्किम १९९५ अंतर्गत निवृत्तीनंतर खातेधारकाला एक हजार रुपये पेन्शन मिळण्याची सुविधा आहे.
निष्क्रिय खात्यांवरही व्याज -
ईपीएफओने गेल्या वर्षी निष्क्रिय खात्यांवरही व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सुविधा देण्यात येत नव्हती. ३ वर्षांपर्यंत ज्या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही त्या खात्यांना निष्क्रिय वर्गात टाकलं जातं. आता अशा खात्यांवरही व्याज मिळणार आहे.
नोकरी बदल्यानंतर लगेच आपलं पीएफ खातं ट्रान्सफर करावं. ट्रान्सफरनंतर पीएफच्या नियमित रक्कमेवर व्याज मिळते. खातं ट्रान्सफर न केल्यास नियमांनुसार, पाच वर्षांहून अधिक काळ खातं निष्क्रिय राहण्याच्या स्थितीत पैसे काढताना त्यावर कर भरावा लागू शकतो.
पीएफ खातं ट्रान्सफर करताना -
नोकरी बदलल्यानंतर पीएफचे पैसे ट्रान्सफर करणं अधिक सोपं झालं आहे. नोकरी बदलण्याच्या स्थितीत आधारकार्डच्या यूएएन क्रमांकावरुन खातं ट्रान्सफर करता येऊ शकतं.
आता नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर पीएफचे पैसे क्लेम करण्यासाठी फॉर्म - १३ भरण्याची आवश्यकता नाही. ईपीएफओने एक नवा फॉर्म - ११ जारी केला आहे. ज्यामुळे अगोदरचं खातं आपोआप नव्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतं.
या परिस्थितीत काढू शकता पैसे -
घर खरेदी करण्यासाठी, गृह कर्जाच्या परतफेडीसाठी, आजारपण, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी पीएफचे पैसे काढता येऊ शकतात. या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना ठराविक कालावधीसाठी ईपीएफओचा सदस्य असणे आवश्यक आहे.
राजस्थानच्या सिरोही शहरातील माली विद्यार्थी निवासस्थान क्षेत्रातील एका न....
अधिक वाचा