By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काही कामासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी आपण रेल्वेचं तिकीट अगोदरच बुकिंग करून ठेवतो... पण, ऐनवेळी आपल्या कामामध्ये किंवा वेळेमध्ये काही बदल होतो आणि आपल्याला प्रवास रद्द करावा लागतो... योग्यवेळी तिकीट रद्द केल्यास आपल्याला भरलेल्या तिकीटाचे पैसे परत मिळतात. परंतु, अनेकदा प्रवास न करताही आपल्याला या तिकीटाच्या पैशांवर पाणी सोडावं लागतं.
आयआरसीटीसीमध्ये ऑनलाईन तिकीट बुक करण्याची आणि रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तिकीट कन्फर्म झालं नाही तर ऑनलाईन तिकीट आपोआपच रद्द होतं. ऑफलाईन (काऊंटरवर जाऊन घेतलेलं) तिकीटावर तुम्ही वेटिंग असेल तरीही प्रवास करू शकता. परंतु, ही सुविधा केवळ स्पीपर क्लाससाठी उपलब्ध आहे. एसी क्लासमध्ये तुम्ही वेटिंग तिकीटावर प्रवास करू शकत नाहीत. तुम्ही तिकीट रद्द केलं तर रद्दीचं शुल्क (cancellation fees) वजा करून उरलेले पैसे परत दिले जातात. परंतु, तिकीट रद्द करण्यासाठी काही नियम आहेत. रेल्वे सुटण्यापूर्वी किती वेळ आधी तुम्ही तिकीट रद्द करत आहात त्यावर तुमचा रिफंड ठरतो.
या स्थितीत तुम्हाला रिफंड मिळू शकत नाही...
- कन्फर्म तिकीट प्रवासापूर्वी चार तास अगोदर रद्द केलं नाही तर रिफंड मिळत नाही
- आरएसी आणि वेटिंग लिस्ट तिकीट रेल्वे सुटण्यापूर्वी अर्धा तास अगोदर रद्द करणं गरजेचं आहे, अन्यथा रिफंड मिळणार नाही
- आरएसी तिकीटावर प्रवास केला नाही तरीही रिफंड परत मिळणार नाही
- काऊंटर तिकीट हरवल्यानंतर प्रवासी डुप्लीकेट तिकीटावर प्रवास करू शकतात
- चार्ट तयार होईपर्यंत तिकीट रद्द करण्यात आलं नाही तर रिफंड मिळू शकत नाही
याशिवाय रेल्वे तिकीट रिफंडसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटरवर जाण्याची गरज नाही. तिकीटाच्या पीएनआर क्रमांकावर तुम्ही रिफंडची माहिती मिळवू शकता. यामध्ये तत्काळ आणि अगोदर बुक करण्यात आलेल्या दोन्ही तिकिटांची माहिती मिळू शकेल.
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये झालेल्या नक्षलवाद्यांसोबतच्या चकमक....
अधिक वाचा