By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी कोल्हापूर सांगली प्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महापुरामुळे वाताहत झाली आहे. येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र राज्य सरकारने कोकणाकडे पूर्ण पाठ फिरवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोकणासाठी केवळ दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. ते ही दोन कोटी अजून आलेले नाहीत.
कोकणात महापुराने दयनीय अवस्था झालेली असताना कोकणातील मंत्री तिकडे फिरकले नाहीत. दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय अनेक ठिकाणी जमिनीला, डोंगराला भेगा पडल्याने तेथील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे भातशेती, आंबा, काजू, कोकम, आदीचे नुकसान झाले आहे. मात्र याबाबतीत कोकणातील मंत्री काहीच करताना दिसत नाहीत. कोकणाबाबत शासन आणि स्थानिक मंत्री उदासिनता दाखवीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महापुराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन उपोषण यासारखे प्रकार टाळण्यासाठी 12 ते ....
अधिक वाचा