By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान मांडल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, जलमय झाले आहे. गेले पाच दिवस तेथील असंख्य कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशा पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्याएवजी मदतीसाठी राज्य सरकारने अटी घातल्या आहेत. दोन दिवस पाण्याखाली असलेल्या कुटुंबाला 10 किलो गहू तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. असा ‘जीआर’सरकारने काढला आहे. म्हणजे मदत मिळविण्यासाठी 2 दिवस पाण्यात राहायला लागणार काय ? आणि नसतील पाण्यात तर मदत देणार नाही काय ?असा संतप्त प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला आहे. असा जीआर काढून पूरग्रस्तांची सरकारने थट्टा केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजब निकष लावण्यात आला आहे. यासंबंधी काढण्यात आलेल्या जी आर मध्ये अतिवृष्टी वा पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखादे क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास, त्यामुळे निराधार होणार्या कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत पुरविण्यास शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात आली आहे. असे म्हटले आहे.
.
कोल्हापुरात महापुरामुळे पुरती दैना झाली आहे. २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेट....
अधिक वाचा