ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर,एनडीआरएपची पथके शहरात दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 10:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर,एनडीआरएपची  पथके शहरात दाखल

शहर : कोल्हापूर

पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडलेत. त्यांना सोडवण्यासाठी बोटीचा वापर केला जातोय. हजारो नागरिकांना आत्तापर्यंत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंचगंगा नदीला मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी शहरात घुसले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएपची दोन पथके शहरात दाखल झाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. कोल्हापुरातले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरातली कुंभार गल्ली, व्हिनस कॉर्नर जलमय झालंय. राष्ट्रीय महामार्ग चारवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही पुराचं पाणी शिरलंय. जिल्ह्यातल्या महापुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली आहेत. कोल्हापूर, सांगली आणि नाशिक इथल्या पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. नौदलाची सहा पथके राज्य सरकारने कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना केली आहेत. हवाई मार्गाने ही पथकं कोल्हापूरकडे झेपावली आहेत. सांगली जिल्ह्यात मदत कार्यासाठी चार एफआरपी बोट रवाना केल्या आहेत. एनडीआरएफचे हे पथक पुण्याहून सांगलीकडे आले आहे.

 

मागे

सुषमा स्वराज यांची प्रेमकहाणी
सुषमा स्वराज यांची प्रेमकहाणी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या माजी परराष्ट्र ....

अधिक वाचा

पुढे  

सुषमा स्वराज यांना देशभरातून श्रद्धांजली
सुषमा स्वराज यांना देशभरातून श्रद्धांजली

 माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व....

Read more