By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 05:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूराच्या पाण्याचा विळखा ६ व्या दिवशीही कोल्हापूर सांगलीत कायम आहे. हळूहळू पाणी ओसरत आहे. पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पण दयनीय अवस्थेला राज्यशासनच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास भाग पाडले असते तर सांगलीला पुराचा फटका कमी बसला असता आणि कोल्हपुरात पुररेषाच निश्चित केलेली नसल्यामुळे करण्यात आलेली बांधकामे कोल्हापूर जलमय होण्यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
या संदर्भात २००५ मधील उदाहरण देण्यात येते. त्याहीवेळी असाच महापूर सांगलीत आला होता. त्यावेळी कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यास तयार नव्हते. तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आणि उप मुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी कर्नाटक सरकारला धमकी देताना सांगितले की, 'कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी जर वाट करून दिली नाही तर आम्ही आमच्या राज्यातील धरणाचे सर्व दरवाजे उघडून सर्व पानी कर्नाटकात घुसवू.' या धमकीला घाबरून तत्कालीन कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली. याची आठवण आता सांगलीकराना होत आहे. यावेळी महाराष्ट्र सरकारने विनंती करूनही कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे सर्व सरवाजे न उघडता केवळ साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. परिणामी सांगलीतील पुर ओसरायला विलंब होत आहे.
तर कोल्हापुरात पंचगंगा नदीची पुररेषा पातळीच निश्चित केली गेली नसल्याचे कळते. कोणत्याही नदीच्या पाण्याची पातळी पुररेषेपर्यंत वाढू लागली की नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तसेच मदत कार्याच्या सज्जतेची प्रक्रिया वेगाने सुरू करता येते. पण पंचगंगेची पुर रेषाच निश्चित केलेली नाही. 1989 ची जी पुरपातळी निश्चित केलेली आहे. तीच पुररेषा समजून कायम ठेवली गेली. बिल्डर लॉबीच्या सोयीसाठी असे करण्यात आले आणि महापुराला निमंत्रण दिले गेल्याचे म्हटले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील चिवेळी येथे डोंगर खचला, तिवरे येथील डोंग....
अधिक वाचा