ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये मदत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये मदत

शहर : कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे महापुराचा वेढा पडला आहे. गेले दोन दिवस तर हजारो नागरिकांना वाचविण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू आहे.  पुराच्या वाढत्या पाण्यात फक्त घरांची कौले शिल्लक राहिलेले पाहायला मिळाली. जनजीवन ठप्प झाले. कित्येक कुटुंबांचा संसार वाहून गेला . त्यामुळे पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10000 रुपये  प्राथमिक मदत सरकार देणार आहे. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. त्याचप्रमाणे ज्यांचे वीज मिटर पाण्याखाली गेले त्यांना मोफत नवे वीज मिटर दिले जातील, असेही त्यांनी संगितले. तर पुराच पाणी ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला जाणार असल्याचे कृषिमंत्री अनिल बोरडे यांनी संगितले.

गेल्या 2 दिवसांपासून पुराचा वेढा पडलेल्या कोल्हापूरला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त कोल्हापूरची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी न केल्यामुळे त्याच्यावर टीका करणायात आली. तेव्हा तेथील बचाव कार्यात अडथळा येवू नये म्हणून आपण तेथे गेलो नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. परंतु आता मुख्यमंत्री आज या भागाचा दौरा करणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी ताल ठोकून आहेत.

 

 

मागे

३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यात रेड अॅलर्ट
३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यात रेड अॅलर्ट

पावसानं सध्या उसंत घेतली असली तरी पुढील तीन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यासह को....

अधिक वाचा

पुढे  

निवासी डॉक्टरांचा संप मागे
निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबईसह राज्यातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 4500 निवासी ....

Read more