By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर आणि सांगलीत अतिवृष्टीमुळे महापूर येऊन दयनिय अवस्था झाल्याचे चित्र आहे. तथापि, या भीषण परिस्थितीला कर्नाटक मधील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियूरुप्पा यांच्याशी चर्चा करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती केली. त्यानंतर कर्नाटक सरकार अलमट्टी मधून ५ लाख क्युसेक पाणी सोडण्यासाठी सहमत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले.
कोल्हापूर-सांगली जलमय होताच काल कोल्हापूरचे जावई असलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि येडियूरुप्पा यांच्याशी फोनवरून चर्चा करुन माहिती घेतली. काल मुख्यमंत्र्यांनी तेथील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. महापुराची स्थिती अलमट्टी मुळे झाल्याचे लक्षात येताच तिथून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती येडियुरप्पा यांना करण्यात आली आहे.
आधीच मुसळधार पावसाने कोल्हापूर-सांगली जलमय झाली असतानाच आता येत्या 48 तासात ....
अधिक वाचा