ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्वामीकारांच गाव पाण्याखाली

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्वामीकारांच गाव पाण्याखाली

शहर : कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील कोवाड हे गाव आपण ओळखतो ते स्वामीकार रणजीत देसाई यांचे गाव म्हणून.त्याच बरोबर कोवाड ही एक मोठी बाजार पेठ म्हणून ही ओळखली जाते. पण सध्या कोल्हापूर भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोवाडच्या ताम्रपणी नदीने रौद्र रूप धारण केल असल्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेल आहे. त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाल आहे. आपती व्यवस्थापन पथकाने मदतीला सुरवात केली आहे. मात्र अजूनही अनेक जण पाण्यात अडकले आहेत. दूरध्वनी व वीज सेवा बंद पडली आहे.

गावात  आलेल्या पुरामुळे तब्बल 2 कोटीची उलाढाल होणारी बाजारपेठ बंद पडली आहे. त्यामुळे व्यापारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब पुराच्या पाण्याने वेधली गेली आहेत.  कोवाड ला लागून असलेल्या गावातही पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोळीन्द्रे, किनी, निट्टूर ह्या गावातही शेतवडीचा भाग पाण्याखाली आला आहे.

 

मागे

भिवंडीत 3 महिन्यांपूर्वी बांधलेला पूल रस्त्यासह वाहून गेला
भिवंडीत 3 महिन्यांपूर्वी बांधलेला पूल रस्त्यासह वाहून गेला

भिवंडी तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिलंजे गा....

अधिक वाचा

पुढे  

ई गव्हर्नन्स विषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
ई गव्हर्नन्स विषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

गव्हर्नन्स 2019 विषयीच्या  22 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन  8 आणि 9 ऑगस्ट रोज....

Read more