By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे झेंडूच्या पिवळ्या जर्द फुलांनी सजवण्यात आले. या सणानिमित्त विठ्ठल रखुमाईस पारंपरिक दागिण्यांची विशेष पूजा बांधण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणार्या अक्षय तृतीया सण महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक शुभ कामांची सुरूवात तसेच विविध वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. याच दरम्यान विट्ठल रुक्मिणीला आज पारंपरिक दागिन्यांनी मढविण्यात आले आहे. आजच्या दिवशी मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असते. त्याच पार्श्वभूमीवर मंदिराचा गाभारा पिवळ्या जर्द फुलांनी सजवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर आणि दोन्ही देवतांच्या सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. तसेच आज दगडू शेठ गणपतीला 11 हजार आंब्याचा नैवद्य दाखविण्यात आला आहे.
श्रीलंकेमध्ये 21 एप्रिलला चर्च आणि हॉटेलांबाहेर झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फो....
अधिक वाचा