ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुलभूषण जाधव केससाठी पाकचे 20 कोटी रुपये तर भारताचा 1 रुपया खर्च

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुलभूषण जाधव केससाठी पाकचे 20 कोटी रुपये तर भारताचा 1 रुपया खर्च

शहर : मुंबई

नौदलाचे निवृत अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने आंतर राष्ट्रीय न्यायालयात ही शिक्षा रद्द व्हावी म्हणून दावा दाखल केला. होता. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजी) कडून जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. 15 -1 मतांच्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल लागला. या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी पाकचे 20 कोटी रुपये खर्च झाले, तर भारताचे जेष्ठ वकील हरिष साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी केवळ 1 रुपया घेतला. या खटल्यात पाकने 2 वकील बदलले,पण साळवे या दोन्ही वकिलांना पुरून उरले आणि कुलभूषण यांची फाशी रोखण्यात यशस्वी ठरले.

कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.त्यांच्यावर पुन्हा खटला चालणार आहे. मात्र आता त्यांच्याकडे कायदेशीर बचावाची संधि आहे. त्यांच्या सुटकेसाठी मोठा कायदेशीर राजकीय आणि कूटनीतीने संघर्ष करावा लागणार आहे.

मागे

कसारा घाटात एक्सप्रेस चा डब्बा रुळावरून घसरला
कसारा घाटात एक्सप्रेस चा डब्बा रुळावरून घसरला

 कसारा घाटात मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस डब्याचे चाक पहाटे 3 वाजून 50 ....

अधिक वाचा

पुढे  

 चंद्रयान -2  सोमवारी अवकाशात झेपावणार
 चंद्रयान -2  सोमवारी अवकाशात झेपावणार

इस्रोने तांत्रिक अडचणीमुळे 15 जुलै ला मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी अवकाशात ....

Read more