ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुलभूषणला मदत देण्यासाठी पाकच्या दोन अटी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुलभूषणला मदत देण्यासाठी पाकच्या दोन अटी

शहर : delhi

हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडावर स्थगिती आणीत त्यांना पाकिस्तानने तातडीने राजनैतिक भेटीचा अधिकार देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना भेटण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तथापि , या भेटीवेळी पाकिस्तानी अधिकारी उपस्थित असतील आणि ही सर्व भेट सिसिटीव्ही कॅमेर्‍याच्या साक्षीने होईल, अशा दोन अटी कुलभूषण पर्यंत पोहोचण्यासाठी पाकने भारतासमोर ठेवल्या आहेत. याबाबतीत जो निर्णय होईल, त्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.

कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत अधिकारी असून त्यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. त्यांना तेथे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र या प्रकरणी भारताने आतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 
 

मागे

गझलकार अनिल कांबळे यांचे निधन
गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी', क....

अधिक वाचा

पुढे  

शेअर बाजारात पडझड कायम
शेअर बाजारात पडझड कायम

गेल्या 5 जुलैला अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात 8 टक्क्यांनी घसरण ....

Read more