By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे निवृत अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी नेदरलंड मधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निर्णय देणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता हा निर्णय घेतला जाणार आहे. या निकाला कडे भारत पाकसह सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशत वादाच्या आरोपा खाली कुलभूषण जाधव यांना पाक सैन्याने बलुचिस्तान मध्ये अटक केली, असा पाकचा दावा आहे. मात्र भारताचा हा दावा वारंवार फेटाळला. नौदलातून निवृत होऊन कुलभूषण जाधव उद्योगाच्या निमित्ताने इराणला गेले होते. तेथे पाक च्या गुप्त चार अधिकार्यानी त्यांचं अपहरण केल होत. अस भारताचं म्हणणं आहे.
एप्रिल 2017 मध्ये पाकच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावणी होती. या विरोधात भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाच दार ठोठावल होत. जेष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी आंतर राष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली आहे.
सोमवारी दुपारपासून बुलढाणा शहरातील बेपत्ता असलेली 3 लहान मुले एका बंद कार म....
अधिक वाचा