By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : navi Mumbai
माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे गुरुवार 25 एप्रिल 2019 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 65 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुली, तीन मुलगे नातवंडे असा परिवार आहे. माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. स्व.आमदार अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या नेहमीच पुढे येवून कार्यात सहभागी होत होत्या.
लहान भावासोबत शेजारच्या इमारतीत खेळत असलेल्या चंचल या 4 वर्षीय चिमुकलीने ज....
अधिक वाचा