ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले 'जम्बो' कोव्हिड सेंटर 'कुपोषित', ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 08:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले 'जम्बो' कोव्हिड सेंटर 'कुपोषित', ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धू

शहर : मुंबई

मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. अशाातच मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन केलेल्या मुलुंड इथल्या कोव्हिड सेंटरमध्ये आयसीयू बेड्स, डायलॅसीस बेड्स (ICU and dialysis beds) उपलब्ध नसल्याची गंभीर बाब सामोर आली आहे. उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सही (ventilators) धूळखात पडून आहेत. त्यामुळे नावाला जरीजम्बोअसली, तरी सोयी-सुविधांच्या बाबतीत ही कोव्हिड सेंटर्सकुपोषित असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत ठिकठिकाणी जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते 7 जुलैला मुलुंडच्या एलबीएस मार्गावरही अशाच कोव्हिड सेंटरची उभारणा करण्यात आली. मुलुंड परिसरातील कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार व्हावा, त्यांना लवकर उपचार मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे.या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन होऊन तीन महिने उलटले तरी आयसोलेशन बेड वगळता 215 आयसीयू बेड्स, 75 डायलॅसिस बेड्स अजूनही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आयसीयू बेड्स 8 जूनपर्यंत उपलब्ध करुन देण्याचे आदेश होते. ते नसल्याने 74 व्हेंटिलेटर्सही धूळखात पडून आहेत. मुलुंड कोव्हिड सेंटरमधील हा भोंगळ कारभार समोर आल्याने मुंबईतील कोरोनाची भीषण परस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

जम्बो कोव्हिड सेंटरचाशून्य उपयोग : भाजप

मुलुंडमधील कोव्हिड सेंटरची ही बाब समोर आल्याने भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. जम्बो कोव्हिड सेंटर्सचा काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप, स्थानिक भाजप आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी केला.

कोरोनाबधित रुग्णाला वेळेत उपचार मिळावे, त्याचा जीव वाचवा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोव्हिड सेंटरचे 7 जुलैला उद्घाटन केले. पण याचा काहीच उपयोग होत नाही असा आरोपही कोटेचा यांनी केलाय.

दरम्यान एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटर किंवा आयसीयूची गरज लागली तर त्याला थेट सायन, जे.जे. किंवा इतर खासगी रुग्णालयांमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. याबाबत विचारले असतासध्या बेड्स (ICU and dialysis beds) उपलब्ध नसले तरी लवकरच ते कार्यान्वित करण्यात येतील असं बीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पण पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना जम्बो कोव्हिड सेंटर्स हे फक्त नावालाच आहेत का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जातोय.

 

मागे

शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली आहे. निर्देशांक ११०० अंशाने कोसळला आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

रुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग किंमत...
रुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग किंमत...

राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यास....

Read more