ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लडाखजवळ LAC वरुन मागे हटण्यासाठी चीनच्या दोन अटी, भारताने लगोलग धुडकावल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लडाखजवळ LAC वरुन मागे हटण्यासाठी चीनच्या दोन अटी, भारताने लगोलग धुडकावल्या

शहर : देश

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अद्याप संपलेला नाही. (India China Ladakh Clash) दरम्यान, चीनने सीमावाद सोडविण्यासाठी भारतासमोर दोन अटी ठेवल्या आहेत. चीनच्या या अटी भारताने धुडकावल्या आहेत. या अटींद्वारे विवादित जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी चीन चालाखी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु भारताने त्यांच्या अटी मान्य केल्या नाहीत.

पँगोंग लेक आणि गालवान व्हॅलीत सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत सात वेळा लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. चर्चेची आठवी फेरी कधी होणार, हे अद्याप ठरलेलं नाही. तीन नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनने भारतासमोर दोन अटी ठेवल्या होत्या. भारतीय सेना फिंगर तीनपर्यंत पेट्रोलिंग करु शकते (गस्त घालू शकते). तर चीनची सेना फिंगर पाचपर्यंत पेट्रोलिंग करेल. याचाच अर्थ पहिल्या अटीद्वारे चीन भारताची सीमा निर्धारित करु पाहतोय, तर दुसऱ्या अटीद्वारे चीन स्वतःची सीमादेखील निर्धारित करु पाहतोय. चीनने म्हटले होते की, भारताने त्यांच्या अटी स्वीकारल्या तर चीन फिंगर चारमधील पर्वत आणि पँगाँग लेकच्या उत्तरेकडील त्यांच्या सैन्याला तिथून हटवेल.याचाच अर्थ चीन सांगू पाहतोय की, विवादित फिंगर चारचा परिसर अक्साई चीनचा हिस्सा आहे. दोन्ही देशांमंधील वाद होण्यापूर्वी भारतीय लष्कर फिंग आठपर्यंत गस्त घालत होतं. त्यामुळेच भारताने चीनच्या या अटी मान्य केल्या नाहीत. विवादित एलएसीबाबत दोन्ही देशांची मतं वेगवेगळी आहेत. चीन म्हणतो की, एलएसी फिंगर चारच्या परिसरातून जाते, तर भारताचे म्हणणे आहे की, एलएसी फिंगर आठच्या परिसरातून जाते.

मागे

लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य
लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

बिहारमध्ये सत्ता टिकवण्याचं आव्हान ज्या नितीशकुमारांसमोर आहे ते आरक्षणाच....

अधिक वाचा

पुढे  

बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचार्याचा मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप
बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचार्याचा मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप

मुंबईतील बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृ....

Read more