By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई आणि उपनगरात सकाळी मुसळधार पाऊस कोसळला. त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीलाही बसला . तर अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. अशातच लालबाग च्या पुलावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाच्या कथड्यावर चढला. सुदैवाने हा ट्रक खाली पडला नाही. मात्र या प्रकारामुळे दादरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तत्काल वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांनी क्रेंनच्या सहाय्याने हा ट्रक तेथून हटवला. त्यांनतर तीन तासांनी या पूलावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्ववत झाली.
गेल्या 5 पाच वर्षात 3 लाख 20 हजार 488 बाल कामगारांची सुटका करण्यात आली. आणि त्यांच....
अधिक वाचा