ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पालघर जिल्हा मुख्यालयातील कामाच्या मोबदल्यात सिडकोला केळवे येथील जमीन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालघर जिल्हा मुख्यालयातील कामाच्या  मोबदल्यात सिडकोला केळवे येथील जमीन

शहर : मुंबई

पालघर जिल्हा मुख्यालयातील विविध विभागांच्या जिल्हास्तरीय शासकीय इमारतींमधील अंतर्गत सजावट व फर्निचरची कामे सिडकोमार्फत करण्यास आणि त्याबदल्यात सिडकोला पालघर तालुक्यातील केळवे येथे जमीन विनामूल्य उपलब्ध करुदेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा अस्त‍ित्वात आला आहे. पालघर जिल्हा मुख्यालयाचा नियोजित विकास करुन विविध विभागांच्या जिल्हास्तरीय इमारती तसेच कर्मचारी निवासस्थाने, पायाभूत सुविधा यांची कामे सिडकोद्वारे करण्यात येत आहेत. सिडकोने या शासकीय कार्यालयातील अंतर्गत सजावटीसह फर्निचरचेही काम करुन द्यावे आणि त्याच्या खर्चाच्या बदल्यात केळवे स्थानकालगत असलेली दुग्ध व्यवसाय विभागाची सुमारे 101 हेक्टर जमीन नवनगर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 113 ए अन्वये सिडकोला विनामूल्य हस्तांतरित करण्यात यावी, या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. 

 

मागे

शासकीय गृहनिर्माण योजनांमध्ये  एका व्यक्तीस एकच घर मिळण्यासाठी धोरण
शासकीय गृहनिर्माण योजनांमध्ये एका व्यक्तीस एकच घर मिळण्यासाठी धोरण

राज्यातील कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एका व्यक्तीस एकच घर मिळ....

अधिक वाचा

पुढे  

ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयात काम न केल्यास डॉक्टरांना 5 वर्षे तुरुंगवास
ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयात काम न केल्यास डॉक्टरांना 5 वर्षे तुरुंगवास

वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस आणि पदव्युतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण....

Read more