By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2020 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केला आहे. मंदिराचे बांधकाम लार्सन अँड ट्युबरो (Larsen & Toubro) कंपनी करणार असून Tata Consultancy ही कंपनी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.
विहिंपने म्हटले आहे की, राम जन्मभूमीसंदर्भातील सत्य सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे. अखेर आता बांधकामाला सुरुवात होणार आहे. दोन एकरपेक्षा जास्त जमिनीवर मंदिर उभारलं जाणार आहे. आमची इच्छा होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाची पायाभरणी करावी, पंतप्रधानांनी आमची मागणी मान्य करत पायाभरणी करण्याचे मान्य केले. मंदिराच्या निर्मितीसंदर्भात लार्सन आणि ट्युबरो कंपनीशी चर्चा केली आहे. हीच कंपनी मंदिराचे बांधकाम करणार आहे. तर टाटा कन्सल्टन्सी कंपनी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.
मंदिर उभारणीच्या कामापूर्वी तांत्रिक तयारी सुरु झाली आहे. उदाहरणार्थ माती कशी आहे, 200 मीटरपर्यंत रेती आहे. त्यामुळेच याबाबत विविध कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. एका आठवड्यात त्याबाबतची माहिती घेतली जाईल. त्यानंतर ठोस कामाला सुरुवात केली जाईल. त्यानंतर जवळपास 3 वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. देशाच्या तरुण पिढीला आम्ही राम मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती देणार आहोत. लोकांनीही मंदिराच्या कामात सहकार्य करावे.
दरम्यान विहिंपकडून सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत गेले होते, तेव्हा त्यांनी राम मंदिराला 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालं आहे. तसेच मोरारी बापू यांच्याकडून 11 कोटी रुपये आले आहेत. अनेक लोक आर्थिक मदत करत आहेत.
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी....
अधिक वाचा