ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोन दिवसात ६४७ कोरोना रुग्णांची वाढ, आरोग्य विभागाची माहिती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन दिवसात ६४७ कोरोना रुग्णांची वाढ, आरोग्य विभागाची माहिती

शहर : देश

मागच्या दोन दिवसात ६४७ रुग्ण वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १२ बळी गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. तबलीगींमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ९६० तबलिगींना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होणं ही गंभीर बाब असून असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर दगडफेक आणि मारहाणीचे प्रकार समोर आले. या पार्श्वभुमीवर महत्वाचा निर्णय केंद्रातर्फे घेण्यात आला आहेराष्ट्रपतींनी व्हिडीओ काँन्फरंसिंग करुन राज्य सरकारांशी चर्चा झाली. रेडक्रॉस, सामाजिक संस्थांशी संवाद साधला. एक चूक आपल्याला मागे घेऊन जाईल असा काळजी वजा इशारा आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे.

कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात बळींचा आकडा २१ केला आहे. राज्यात ३६ तासांत ८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यत वाढ दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर जगभरात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. आतापर्यंत १० लाख जणांना लागण तर ५० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत सर्वाधिक १३ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे तर अमेरिकेत एकाच दिवसात हजारावर बळी गेले आहेत.

लॉकडाऊनमुळे काश्मीरच्या दुर्गम भागात अन्नधान्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन लष्कराने जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात अन्नधान्यचा पुरवठा सुरू केला आहे. स्थानिक युनिट्समधून गाड्यांमधून धान्याची पोती घेऊन जाऊन आर्मीचे जवान वाटप करत आहेत. सैनिकांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय. गव्हाचं पीठ, तांदुळ या अन्नधान्यांचं वाटप इथे गावागावात केलं जातंय. भारत पाकिस्तान सीमेवर सध्या लॉकडाऊनमुळे गावांमधली दुकानं बंद आहेत. मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी कोणतीही वाहनं नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातल्या ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.

 

मागे

जगभरात कोरोनाचे १० लाखांवर रुग्ण, ५३ हजारांवर मृत्यू
जगभरात कोरोनाचे १० लाखांवर रुग्ण, ५३ हजारांवर मृत्यू

जगभरात कोरोनाचं संकट किती तीव्र झालं आहे हे नव्या आकडेवारीवरून दिसून येत आ....

अधिक वाचा

पुढे  

तेव्हा लोकांनी ढोल वाजवले, आता आग लावली नाही म्हणजे झालं : संजय राऊत
तेव्हा लोकांनी ढोल वाजवले, आता आग लावली नाही म्हणजे झालं : संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे ल....

Read more