ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 06:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शहर : मुंबई

ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार  Dr. Farokh E Udwadia आणि डॉ. प्रतित समधानी हे लतादीदींवर उपचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लतादीदी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला समोर येत असलेल्या माहितीनुसार मंगेशकर कुटुंबीय रुग्णालयात त्यांच्यासोबत असल्याचं कळत आहे.

मागे

बीडमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार
बीडमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार

बीडमधील पाटोदा- मांजरसुंबा रोडवर ट्रक आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाच कुट....

अधिक वाचा

पुढे  

जाणून घ्या पॅन कार्डचा ‘हा’ महत्त्वाचा नियम, नाही तर….
जाणून घ्या पॅन कार्डचा ‘हा’ महत्त्वाचा नियम, नाही तर….

इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) करण्यापासून ते आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी पॅन....

Read more