By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबईत मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावती रुग्णालयात यात दाखल व्हावे लागले तर गायन कोकिळा लता मंगेशकर यांनाही श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. तर संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांनाही उद्या सोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान आज लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजभळ, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आदी नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच वाढलाय. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते ....
अधिक वाचा