By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI ) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आधार लिंक बंधनकारक करण्यात आले आहे. जर आधार लिंक केले नसेल तर तात्काळ करुन घ्या अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. आधार लिंक करण्यासाठी काही पर्यायही देण्यात आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने एक अधिसूचना जारी केली आहे ज्यात असे म्हटले आहे की, एसबीआय खातेधारकांना त्यांचे खाते आधार कार्डसह लिंक करणे अनिवार्यपणे आहे. ( SBI account holders will need to mandatorily link their account with the Aadhaar card.)
स्टेट बँक ऑफ इंडियाने एक ट्विटमध्ये करत म्हटले आहे की, "आम्ही आमच्या ग्राहकांना हे सांगू इच्छितो की, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मिळवण्यासाठी एसबीआय बचत खात्यास आधारशी लिंक करा. थेट लाभासाठी भारत सरकारकडून कोणताही लाभ किंवा अनुदान मिळण्यास इच्छुक असणाऱ्यांना आधार कार्ड लिंग करणे अनिवार्य आहे".
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपला आधार आपल्या बँक खात्याशी जोडणे बंधनकारक नाही. जर आपल्याला शासकीय अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्यात जोडणे बंधनकारक आहे. एसबीआयच्या बचत खात्यास आधारशी जोडण्याचे चार मार्ग आहेत. तुम्ही एटीएम, इंटरनेट बँकिंग शाखेत किंवा एसबीआय अॅपवरून आधार कार्ड लिंक करू शकता.
आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही ते तपासा
- www.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या
- आधार सेवा विभागाचा (Aadhar services section) शोध घ्या आणि आधार / बँक खाते जोडण्याची स्थिती तपासण्यासाठी माय आधारवर (My Aadhar) क्लिक करा
- आपला आधार कार्ड नंबर (Aadhaar card number) प्रविष्ट करा
- आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आपल्याला ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट करा आणि लॉग इन करा. (You will get OTP on your registered mobile number, enter it and log in.)
असे अनेक मार्ग आहेत ज्यात वापरकर्ते त्यांच्या बँक खात्यास त्यांच्या आधार कार्डशी (Aadhaar card) लिंक करू शकतात.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही जिल्....
अधिक वाचा