By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जालना
जालना - “राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 11 हजार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती”, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जवाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचंही पाटील यांनी म्हटलं.
राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अमराठी बँक व्यवस्थापक असल्याने, कर्जमंजुरी होण्यास अडचणी येत असल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. कर्जवाटपाची ही प्रक्रिया काही प्रमाणात संथ आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अमराठी भाषिक बँक व्यवस्थापक आहेत. त्यांना ही योजना समजत नाही. त्यामुळे ज्या बँकेत अमराठी बँक व्यवस्थापक आहे, त्या ठिकाणी एका मराठी अधिकाऱ्याकडून या योजनेचे काम करून घेण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
11 हजार मराठा तरुणांना 550 कोटी रुपयांचे कर्जवाटप : नरेंद्र पाटील https://www.tv9marathi.com/maharashtra/narendra-patil-president-annasaheb-patil-mahamandal-said-550-crore-loan-distributed-to-maratha-youth-157097.html
Posted by TV9 Marathi on Tuesday, December 24, 2019
औरंगाबाद - आता विद्यार्थ्यांचं मस्टर इतिहास जमा होणार आहे. 'हजर ....
अधिक वाचा