By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वसई-विरार भागात अतिवृष्टीनंतर 36 तासात 500 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच, जवळपासच्या भागांतून पूर आला आहे आणि नालासोपारा येथे ट्रॅकवर जोरदार पाणी साचले. वसई-विरार रेल्वेसेवा तात्पुरती निलंबित केल्या आहेत.
वसई विरार पालघर भागात गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पालघर जिल्ह्यात 154 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.
हार्बर मार्गावर वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. सेंट्रल रेल्वेला कुर्ला कंजूर मार्ग विक्रोळी येथे पाणी साचले आहे.
रेल्वे च्या लांब पल्याच्या गाड्या रद्द केल्या असून प्रवाशांनी https://enquiry.indianrail.gov.in/ntes/index.html लिंक वर किवा 139 ह्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून माहिती घेण्यास सांगितले आहे.
Vasai-Virar area has received about 500mm rainfall in little more than 36 hrs following very heavy #MumbaiRains. Also, there was flush flooding from nearby areas which resulted in heavy water logging on tracks at Nallasopara. Services are temporarily suspended btwn Vasai-Virar. pic.twitter.com/k1kHINtxIZ
— Western Railway (@WesternRly) September 4, 2019
प्रशासनाकडून इशारा
तर मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. अमृत नगर जंक्शन , गांधी नगर, घाटकोपर साकीनाका जंक्शन,नेताजी पालकर चौक अंटोप हिल धारावी अंधेरी सबवे , पश्चिम द्रुतगती मार्ग, मिलन सब वे, वडाला किंग सर्कल, पोईसर सब वे, दादर टी.टी., मजगाव डोक, पोस्टल कॉलनी चेंबुर या भागात पाणी साचले आहे. पोलिस व महानगरपालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अतिवृष्टी साठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेची वसई ते विरार ची वाहतूक सकाळी 9.16 मिनिटांनी पॉइंटच्या ....
अधिक वाचा