By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 12:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kalyan
ठाणे - मध्य रेल्वेवरील डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान राजेंद्रनगर- पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानं कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या जलद वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जलद मार्गावर पाटण एक्स्प्रेस उभी असल्याने जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसौय झाली आहे. जलद मार्गावर राजेंद्रनगर-पाटणा एक्स्प्रेस बंद पडल्याने कल्याणकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेसकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या आहेत.
दरम्यान, बंद पडलेल्या पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा एक्स्प्रेसला नवे इंजीन जोडण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नयेत यासाठी जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रकही कोलमडले आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.
मुंबई - लहान मुलांच्या हालचालींमधील सुसूत्रता, कौशल्ये, आकलन क्षम....
अधिक वाचा