By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bhubaneswar
भुवनेश्वर - कटकमधील नरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे कळते. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस भुवनेश्वरला जात होती. आज सकाळी सलगाव आणि नरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ ही गाडी येताच त्या भागात डाट धुके होते. या धुक्यामुळे रेल्वे चालकाला पुढे काही दिसले नव्हते. त्यामुळे एक्स्प्रेसने त्या मार्गावरील एका मालगाडीला धडक दिली. त्यात ही गाडी रुळावरून घसरली आणि दुर्घटना घडली.
#UPDATE Chief Public Relation Officer (CPRO), East Coast Railway: 20 people injured after eight coaches of Lokmanya Tilak Express derail near Salagaon. No casualty reported till now. #Odisha https://t.co/JqaXdhzHTN
— ANI (@ANI) January 16, 2020
या दुर्घटनेत ४० प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेताच बचावकार्य सुरू केलं. रेल्वेचे ६ डबे रुळावरून घसरले आहेत. शिवाय घनदाट जंगल आणि दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे समजते.
मुंबई - नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच राज्यात थंडीला सुरुवात झाली....
अधिक वाचा