By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 03:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
आज संपूर्ण देशात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र या उत्सवाला पश्चिम बंगाल मध्ये गालबोट लागले आहे. बंगाल मधील 24 परगणा जिल्ह्यात जन्माष्टमीचा उत्सव सुरू असतानाच लोकनाथ मंदिराची भिंत कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर 27 जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमीना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमी असलेल्यांना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
जगाला 20 % ऑक्सिजन देणारे, जगाचे फुफ्फुस म्हणून ओळख असेलेले ब्राजीलमधील पर्ज....
अधिक वाचा