ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वर्षाच्या पहिल्या दिवशीच गॅस दर वाढले

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वर्षाच्या पहिल्या दिवशीच गॅस दर वाढले

शहर : देश

         नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांनी  गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९ रुपयांची वाढ केली आहे. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून नववर्ष स्वागताच्या जल्लोषात मग्न झालेल्या ग्राहकांची झोप गॅस दरवाढीने उतरणार आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागला आहे तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.


        दिल्लीत १४.२ किलोचा गॅस सिलिंडरचा दर आता ७१४ रुपये झाला आहे. मुंबईत ग्राहकांना घरगुती गॅससाठी ६८४.५० रुपये मोजावे लागतील. मुंबईत गॅस सिलिंडर १९.५० रुपयांनी महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ३३ रुपयांची वाढ झाली आहे. मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे.


        चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदल इंधन आयातीच्या खर्चात वाढ करतात. २०१९ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात २.२८ टक्के अवमूल्यन झाले.

         

 

मागे

रेल्वेच्या तिकीटदरात वाढ पण मुंबईकरांना दिलासा
रेल्वेच्या तिकीटदरात वाढ पण मुंबईकरांना दिलासा

        नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे प्रवास महाग झाला आहे. उ....

अधिक वाचा

पुढे  

वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात मध्यप्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात मध्यप्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

           नागपूर - गेल्या वर्षी २०१९मध्ये देशात ११० वाघांचा मृत्यू झा....

Read more