By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 20, 2020 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अकरावीच्या ऍडमिशनसाठी (Eleventh standard admission entrance special list details)येत्या गुरूवारपासून विशेष प्रवेश फेऱ्या सुरू होत आहेत. सत्तर हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या यादीची प्रतिक्षा आहे. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दुसरी विशेष फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
गुरूवारपासून अकरावीच्या ऍडमिशनसाठी विशेष फेऱ्या सुरू होणार आहेत. सत्तर हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या यादीची प्रतिक्षा करत आहेत. २४ आणि २७ डिसेंबरला विशेष प्रवेश यादी जाहीर होणार असून पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित होणार आहे.
असे असेल अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक
२० डिसेंबर - रिक्त जागांची स्थिती जाहीर करणे
२० ते २२ डिसेंबर - महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे
२३ डिसेंबर - तांत्रिक प्रक्रियेचा दिवस
२४ डिसेंबर - सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी जाहीर
२४ ते २६ डिसेंबर - विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
२६ डिसेंबर - महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
२७ डिसेंबर - प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांची यादी
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एक लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी यावेळी स्पर्धा पाहायला मिळाली. तिसऱ्या फेरीसाठी वाणिज्य शाखेच्या ६३ हजार ३५९ जागा होत्या, तर ७४ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. म्हणजेच उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दहा हजार अर्ज जास्त आहेत. २८ हजार ८३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. विशेष फेरीसाठी कोट्यातील शिल्लक जागा समाविष्ट होणार आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप उद्या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार ....
अधिक वाचा