By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 14, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
बीडच्या सिरसाळातील एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासद्दश्य पदार्थ बाहेर पडल्याची घटना घडलीय. या घटनेमूळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, जमिनीतून लाव्हासद्द्श्य पदार्थ बाहेर पडण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर आणि घटनेची माहिती पसरल्यानंतर हा लाव्हासद्दश्य पदार्थ पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. दरम्यान याबाबतीत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी हा सगळा प्रकार वीजेती तार पडल्याने झाला असल्याचे सांगितले. काल संध्याकाळी पश्चिम मराष्ट्र आणि मराठवाड्यात जोदार पाऊस झाला. तसेच, वीजेची तार पडली असल्याचेही सांगितले जात आहे. माञ, जोदार पाऊसामूळे कोणतेही नुकसान झाले नाही.
आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस बंदीच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्....
अधिक वाचा