By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सत्तेवर येतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केलीय. देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक पायाभूत कामांचे प्रोजेक्ट्स मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू झालेत. त्यामुळे त्या सगळ्या प्रकल्पांचं काय होणार? राज्य सरकार त्यात बदल करणार का? केंद्राची मदत त्या प्रकल्पांना मिळेल का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आरे मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती दिल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं. विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 5 वर्षात आम्ही सत्तेत होतो. पण 5 वर्षात विकासकामं कधी, कुठे कशी झाली किती खर्च झाला याबाबत मी माहीती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत.काही विकासकामं ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहत आहोत.
काही विकासकामं करणं गरजेचं आहे पण ती कामं रखडलेली आहे तेही पाहणार आहोत. हे फक्तं माझं सरकार नाही...तर तूमचं सर्वांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे.बुलेट ट्रेन चा आढावा घेऊ, बुलेट ट्रेन अजूनही रद्द केली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरे करशेड व्यतिरिक्त मी मेट्रोच्या कोणत्याही कामाला विरोध केला नाही. आक्षेप असता तर मेट्रो अडवली असती. वृक्षतोड नाही तर त्यातील अनेक जीवांना धोका आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार.खाते वाटपा संदर्भात आम्ही तीनही पक्ष अत्यंत समजूतीने चर्चा करून अंतीम खाते वाटप आम्ही जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शुक्रवारी ब्रिटनमधील लंडन ब्रिज येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने साऱ्या ....
अधिक वाचा