By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2020 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये तीनने वाढ झाल्यामुळे राज्यातील आकडा 341 वर पोहोचला आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरातील दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्या दोघांवरही डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे शहरात 33, तर पुणे ग्रामीणमध्ये 07 असे कोरोनाचे 40 रुग्ण झाले आहेत. यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पिपरी चिंचवडमध्ये 12 कोरोनाग्रस्त असून यापैकी दहा जण आधीच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 52 वर गेला आहे.
दरम्यान, बुलडाण्यातही आणखी एकाचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर गेली आहे. त्यातील एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे. काल दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तिघांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.
महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?
मुंबई – 181
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 16
नवी मुंबई – 13
कल्याण – 10
ठाणे – 8
वसई विरार – 6
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
अहमदनगर – 8
बुलडाणा – 5
यवतमाळ – 4
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
नाशिक – 1
जळगाव- 1
इतर राज्य (गुजरात) – 1
एकूण 341
देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या....
अधिक वाचा