ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुबोध जैस्वालांची CISF महासंचालकपदी बदली, महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 31, 2020 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुबोध जैस्वालांची CISF महासंचालकपदी बदली, महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी?

शहर : मुंबई

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृहमंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानंतर त्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. ती विनंती मान्य ही करण्यात आली होती.

सुबोध जैस्वाल यांची बदली करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी 4 वरिष्ठ IPS आधिकारी मैदानात आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा बदल्या होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सुबोध जैस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि  ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला होता. राज्य सरकारबरोबर पटत नसल्यानं पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता.  दरम्यान सुबोध जैस्वाल यांची सीआयएसएफ महासंचालकपदाचा कार्यकाळ हा नियुक्तीपासून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत असणार आहे.

सुबोध जैस्वाल हे केंद्राच्या सेवेत गेल्यानंतर त्यांच्या जागी आता नवे महाराष्ट्र पोलीस महासंचालक येणार आहे. सुबोध कुमार जैस्वाल यांच्यानंतर वरिष्ठ असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक डी .कनकरत्नम किंवा गृहनिर्माण पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र 1987 बॅचमधील कनकरत्नम हे उद्या 31 डिसेंबर 2020 रोजी निवृत्त होत आहेत. तर बिपीन बिहारी हे मार्च 2021 मध्ये निवृत्त होत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारला आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर पुढील चार अधिकाऱ्यांपैकी एकाची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करावी लागणार आहे.

1) संजय पांडे , पोलीस महासंचालक , होमगार्ड

2) हेमंत नगराळे , पोलीस महासंचालक , लीगल अँड टेक्निकल

3)सुरेंद्र कुमार पांडे , महासंचालक , जेल विभाग

4) रजनीश सेठ , पोलीस महासंचालक , एसीबी , महाराष्ट्र राज्य

राज्याचे पोलीस महासंचालकांची येत्या काही दिवसात नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदाकडे नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस महासंचालक यांची यादी

बॅच 1985

1) पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य – सुबोध कुमार जयस्वाल

2) पोलीस महासंचालक , होमगार्ड – संजय पांडे

बॅच 1987

3) पोलीस महासंचालक , लीगल अँड टेक्निकल- हेमंत नगराळे

4) पोलीस महासंचालक , महाराष्ट्र सुरक्षा दल – डी .कनकरत्नम

5)पोलीस महासंचालक , गृहनिर्माण – बिपीन बिहारी

6)पोलीस महासंचालक , कारागृह .- सुरेंद्र कुमार पांडे

बॅच 1988

7) पोलीस महासंचालक , एसीबी – रजनीश सेठ

8) पोलीस महासंचालक , नागरी संवरक्षण दल – रश्मी शुक्ला

9) पोलीस आयुक्त , मुंबई ( पोलीस महासंचालक दर्जा) – परबीर सिंग

मागे

IRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य
IRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीत कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण, सरकारने घेतला मोठा निर्णय
दिल्लीत कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण, सरकारने घेतला मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रुपातील कोरोना विषाणूमुळे (Corona New Strain) जगभरातील ....

Read more