ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'महा'राष्ट्रीय आपत्ती! शनिवारी दिवसभरात १२ रुग्णांची पडली भर, राज्यात सर्वाधिक ३१ रुग्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 15, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'महा'राष्ट्रीय आपत्ती! शनिवारी दिवसभरात १२ रुग्णांची पडली भर, राज्यात सर्वाधिक ३१ रुग्ण

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३१ वर गेला आहे. पुणे १५, मुंबई ५, कामोठे पनवेल, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, नगर येथे प्रत्येकी १, यवतमाळमध्ये २ व नागपुरात ४ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे विधानसभेत म्हणाले, आरोग्य विभागाने राज्यातील सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालये, अंगणवाडी, व्यवसाय प्रशिक्षण संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १०वी, १२ वीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेने लग्न समारंभ घरगुती पद्धतीने करावेत. खासगी ट्यूशन, कोचिंग क्लासेसही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.

बुलडाणा -: सौदीहून परत आलेल्या संशयिताचा मृत्यू, अहवालाची प्रतीक्षा

बुलडाणा  सौदीतील हजहून बुलडाणा येथे परतलेल्या एका वृद्ध संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या रुग्णाला सर्दी व तापाची लक्षणे असल्याने विलगीकरण कक्षात भरती केले होते. या रुग्णाला सौदीतच सर्दी, ताप व खोकला होता. उपचार न केल्याने प्रकृती खालावली होती. याच अवस्थेत त्याला भारतात आणले. मुंबईत तपासणीनंतर प्रकृती ठीक असल्याचे सांगून त्याला घरी पाठवले. त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा आजारही होता.

कुठे किती रुग्ण

पुणे 15

मुंबई 5

यवतमाळ 2

नागपूर 4 

नागपूर -: रुग्णालयातून पळालेल्या चार संशयित रुग्णांवर गुन्हे दाखल

नागपूर | उपचार वा चाचणी अहवालाची प्रतीक्षा न करता मेयो रुग्णालयातून पळून जाणाऱ्या ४ संशयित रुग्णांवर महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौघांचेही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आहेत, हे विशेष.

अहमदनगरमधूनही तिघे पळाले  

जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचे तीन संशयित रुग्ण पळून गेल्याचे शनिवारी समोर आले.

शॉपिंग माॅल मार्चपर्यंत बंद, किराणा दुकाने सुरू

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मुंबई, नागपूर, यवतमाळमध्ये नवे रुग्ण आढळले. ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शॉपिंग मॉल बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी किराणा दुकाने सुरूच राहतील.

पहिली ते ९ वीपर्यंतच्या परीक्षाही लांबणीवर

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, इयत्ता पहिली ते ९ वीपर्यंतच्या परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या वर्गांच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षाही पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र १० वी, १२ वीच्या परीक्षा सुरू राहतील.

अफवाबहाद्दर व्हॉट्सॲप ॲडमिनवर गुन्हे 

व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर कोरोनाबाबत गैरसमज, खोट्या प्रचाराची पोस्ट पाठवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशा व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही निर्देश आहेत.

मास्कची साठेबाजी : नकली सॅनिटायझर विक्रीवर कारवाई

मास्कची साठेबाजी, सॅनिटायझर, हँडवॉशचा चढ्या दराने विक्रीसाठी कृत्रिम तुटवडा करणारे, तसेच बनावट सॅनिटायझर, हॅँडवॉशची निर्मिती करणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले

मागे

मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 31 वर येऊन पोहोचली आहे. कोरोनाची वाढती ....

अधिक वाचा

पुढे  

शेअर बाजार कोसळला; आशियाई बाजाराची पडझड सुरुच
शेअर बाजार कोसळला; आशियाई बाजाराची पडझड सुरुच

कोरोनाचा कहर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर झालेल्या त्याच्या थेट परिणामांच....

Read more