ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शासकीय कार्यालयात आता अर्ध्या तासांचा ‘लंचटाइम’

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 08, 2019 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शासकीय कार्यालयात आता अर्ध्या तासांचा ‘लंचटाइम’

शहर : मुंबई

महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसेच मुंबईबाहेरच्या शासकीय कार्यालयांमधील लंचटाइम ऑगस्ट १९८८ मध्येच निश्चित करण्यात आला होता. दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. तर १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन या वेळेत जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालयाव्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबध असलेल्या कार्यालयांमध्ये सर्वसामान्य लोक तक्रारी व गाऱ्हाणी घेऊन येतात, तेव्हा बऱ्याच वेळेस अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाहीत. 
रकारी कार्यालयांमध्ये दुपारची जेवणाची वेळ कार्यालयाच्या सोयीनुसार ठरवली जाते. त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारी राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाची वेळ निश्चित करण्याचा सरकारचा विचार होता, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद आहे. 

राज्‍यातील सर्व शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंचटाइम आता अर्ध्या तासाचाच असणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोन वाजता अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. खात्‍यातील सर्वच जणांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्‍यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणत्‍याही वेळी 'साहेब जेवायला गेले आहेत' ही सबब कानावर पडणार नाही. 
आता नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी दुपारी एक ते दोन या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाहीत, याची संबंधित कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी असे आदेशही सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. त्यामुळे सर्व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३० मिनिटात जेवण संपवून टेबलवर बसून काम सुरू करावे लागणार आहे. 

मागे

केरळमध्ये मान्सून ची सुरवात
केरळमध्ये मान्सून ची सुरवात

सर्वांना उत्सुकता असलेल्या मान्सूनचे अखेर भारतात आगमन. केरळ मध्ये मान्सून ....

अधिक वाचा

पुढे  

गोवा एअरपोर्टवर नौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळून आग
गोवा एअरपोर्टवर नौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळून आग

विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर नौसेनेच्या मिग २९ विमानाचा 'ड्रॉप टँक' अ....

Read more