By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2020 04:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत भारतात लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमधून आता काही गोष्टी वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींना सूट देण्यात आली आहे.
राज्य सरकारने सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तसंच बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्टयाचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे.
राज्य सरकारने दिलेली ही परवानगी लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करण्याच्या अटींवर देण्यात आली आहे. या अटींचं पालन करण्याची जबाबदारी संस्थेचा प्रमुख आणि दुकानाच्या मालकाची असणार आहे.
लॉकडाऊनमधून या गोष्टी वगळल्या
-शेती उत्पादनांची खरेदी करणाऱ्या (किमान हमी दरासह) संस्था, विशेषतः कापूस आणि तूर डाळ यांची खरेदी करणाऱ्या संस्था
- कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेली मंडी
- शेतकऱ्यांकडून आणि शेतमजुरांकडून करण्यात येणारी शेतीची कामे, मासेमारी, मत्स्य उद्योगासाठी लागणारे खाद्य आणि व्यवस्था, शित साखळी, विक्री व पणन, मत्स्यपालन, व्यावसायिक मत्स्यकेंद्र, खाद्य केंद्र, मासे, कोळंबी वाहतूक आणि अन्न उत्पादने, मत्स्य बीज आणि खाद्य, यासाठी काम करणारे कामगार
- पेसा म्हणजेच पंचायत (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारीत) कायदा, 1996, नॉन पेसा वन हक्क कायदा क्षेत्रातील किरकोळ वन उत्पादने( साठा, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री), वने व बिगर वने क्षेत्रातील तेंदू पत्ता वेचणी, साठा आणि गोदामापर्यंतची वाहतूक
- जीवनावश्यक तसेच इतर वस्तूंसाठी आंतरराज्यीय तसेच दोन राज्यांमधील ट्रक वाहतूक, मालवाहतूक सुरु राहील. मात्र वाहनचालका व्यतिरिक्त फक्त एका व्यक्तीला विहित कागदपत्रानुसार परवानगी असेल. यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नसेल. रिकामे ट्रक तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना माल आणण्यासाठी किंवा पोहोचविण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
-शीतगृहे, वखार सेवा, ठोक विक्री आणि वितरण व्यवस्था
- पुरवठा साखळी आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणि मालाची वाहतूक
- पुरवठा साखळी आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणि मालाची वाहतूक
-सेबीद्वारे अधिसूचित केलेल्या एनबीएफसी आणि भांडवली बाजारातील सेवा
- शेती अवजारांशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर, शेतीसाठी लागणारे बी बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे, अवजारांचे सुटे भाग, दुरुस्ती ही दुकाने
- ट्रक दुरुस्तीची विशेषत: करुन पेट्रोल पंपाजवळची दुकाने
- वीज वितरण आणि पारेषण करणाऱ्या जनित्र (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्तीची दुकाने
- शेती आणि फुलशेती उत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक
- बी-बियाणे, खते, आणि कीटकनाशके यांचे उत्पादन आणि पॅकेजिंग
- कोळसा आणि खाण उत्पादने, वाहतूक, खाण उद्योगांना स्फोटकांचा पुरवठा तसेच खाण उद्योगाशी इतर बाबी
- अन्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे तयार करणारे उद्योग
- गव्हाचे पीठ, डाळी, खाद्यतेल उत्पादन करणारे सुक्ष्ममध्यम आणि लघु औद्योगिक घटक- बंदरे, विमानतळ,राज्याच्या सीमा येथील सीमाशुल्क तपासणी तसेच जीएसटीएन हब, एमसीए 21
Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दर दिवशी अधिकाधिक वेगाने वाढत असल्याचं प....
अधिक वाचा