By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2020 07:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतंच राज्य सरकारने 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, अशी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना जारी केली आहे. दरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन्ही दिवशी जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 31 डिसेंबर 2020 आणि नववर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. येत्या 31 डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेक नागरिक घराबाहेर पडतात. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
31 डिसेंबरसाठी काही नियम
नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करा.
समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी करु नये.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
60 वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळा.
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये.
मिरवणुका काढू नये.
धार्मिक स्थळी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा
फटाक्यांची आतिषबाजी करु नये.
नागरिकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करु नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये. तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात
फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
कोव्हिड १९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.
वाहन नोंदणी, (Vehicle Registration) ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि फिटनेस प्रमाणपत्र अशा ....
अधिक वाचा