ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ई-पास रद्द, हॉटेल सुरु, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद, राज्य सरकारची नियमावली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 01, 2020 07:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ई-पास रद्द, हॉटेल सुरु, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद, राज्य सरकारची नियमावली

शहर : मुंबई

राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून -पासची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र शाळा-कॉलेज हे अद्याप बंद राहणार आहेत.

राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी -पासची गरज लागणार नाही. तसेच हॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो आणि सिनेमागृह अद्याप बंद राहणार आहेत.

अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद?

कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार

शाळा-कॉलेज मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही

खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे

चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही

शाळा, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लास 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्याशिवाय सिनेमागृह, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही पुढील काळापर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. मेट्रो ट्रेनही बंद ठेवल्या जातील.

तर 2 सप्टेंबरपासून अनावश्यक दुकानं सुरु राहतील. तसेच दारुची दुकानेही सुरु राहणार आहे. हॉटेल आणि लॉज हे 100 टक्के क्षमतेद्वारे सुरु करता येणार आहे.त्याशिवाय मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. त्याशिवाय जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी -पासची गरज लागणार नाही.

मागे

रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचालींना वेग
रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचालींना वेग

कोरोना व्हायरसच्या संकटात लागू करण्यात आलेल्या अनलॉक ४.० ची सुरुवात सप्टें....

अधिक वाचा

पुढे  

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी अनंतात व....

Read more