ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'महाराष्ट्रात लढण्याची परंपरा आहे, लढतो तो जगतो' - मुख्यमंत्री

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 06:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'महाराष्ट्रात लढण्याची परंपरा आहे, लढतो तो जगतो' - मुख्यमंत्री

शहर : मुंबई

     औरंगाबाद -  राजकारण्याला घर पेटवणं सोपं, पण घरातली चूल पेटवणं कठीण आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’ या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. “आपल्या उद्योजकांमध्ये बळ आहे. देशाचं लक्ष वेधेल असं हे एक्स्पो आहे. उद्योजकांना खंबीर करणारं हे सरकार असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय एक्स्पो करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.


       दरम्यान, “उद्योजकांसमोर अनेक अडचणी आहेत. अडचणींचा सामना करून उद्योजकांनी मोठं विश्व उभं केलं आहे. देशात, जगात, देशात आर्थिक मंदी आहे म्हणून रडत बसलो तर आपण लढू शकणार नाही आणि रडणारे तसं नीट जगूही शकणार नाही. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे,” असंही ते यावेळी म्हणाले. 

                                                                                    
     “उद्योजकांच्या काही सूचना असतील तर त्या त्यांनी सरकारलाल पाठवाव्यात. राज्यात विकासाचा दिवा पेटला पाहिजे. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ, तुम्ही भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. “देशाला महाशक्ती बनवताना शक्ती देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करेल,” असंही त्यांनी नमूद केलं.
 

मागे

सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी १५ ते १९ जानेवारीपर्यंत बंद राहणार
सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी १५ ते १९ जानेवारीपर्यंत बंद राहणार

       मुंबई – सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं १५ जानेवारी ते १९ जानेवा....

अधिक वाचा

पुढे  

काश्मीरमध्ये इंटरनेटवरील बंदी जाचक – सर्वोच्च न्यायालय
काश्मीरमध्ये इंटरनेटवरील बंदी जाचक – सर्वोच्च न्यायालय

        नवी दिल्ली - काश्मीरमध्ये इंटरनेटवर पूर्णपणे बंदी आणणं जाचक असून....

Read more