ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

शहर : मुंबई

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती समोर आली आहे. जगभरातील सर्वच देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने इंट्री केली आहे. भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात काही रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.

यापूर्वी गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणाणे सुरु राहणार आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यंदा नागरिकांनी घराबाहेर पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी काही नियम

नागरिकांनी घराबाहेर पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करा.

समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी करु नये.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

60 वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळा.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये.

मिरवणुका काढू नये.

धार्मिक स्थळी एकाच वेळी गर्दी करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा

फटाक्यांची आतिषबाजी करु नये.

विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

मागे

New Year | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऑन ड्युटी 24 तास
New Year | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऑन ड्युटी 24 तास

नवीन वर्षाचे स्वागत दारु पिऊन करणार असाल तर सावधान, कारण तुमच्यावर वाहतूक प....

अधिक वाचा

पुढे  

गेटवे,मरीन ड्राईव्हला5पेक्षा जास्त लोकांना बंदी,रात्री11नंतर हॉटेल बंद;गृहमंत्र्यांचं नियमांकडे बोट
गेटवे,मरीन ड्राईव्हला5पेक्षा जास्त लोकांना बंदी,रात्री11नंतर हॉटेल बंद;गृहमंत्र्यांचं नियमांकडे बोट

तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन करण्याचा बेत आखत असाल किंवा त्याची तयारी पूर्ण ....

Read more