ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

शहर : मुंबई

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. तर शिवदीप लांडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

कोणाची बदली कुठे?

अमिताभ गुप्तापोलीस आयुक्त, पुणे शहर

विनीत अगरवालप्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

अनुप कुमार सिंहउपमहासमादेशकर, गृह रक्षक दल, मुंबई

संदीप बिश्नोईअपर पोलीस महासंचालक, रेल्वे, मुंबई

डॉ के व्यंकटेशमअपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), मुंबई

मनोज कुमार शर्मापोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई

जयंत नाईकनवरेपोलीस उपमहानिरीक्षक, व्हीआयपी सिक्युरिटी, मुंबई

निशीत मिश्राअपर पोलीस आयुक्त (संरक्षण सुरक्षा) मुंबई शहर

सुनील फुलारीअपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर

रंजन कुमार शर्मापोलीस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

शिवदीप लांडेपोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई

ब्रिजेश सिंहविशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), मुंबई

मकरंद रानडेविशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

संजय बाविस्करपोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे

नविनचंद्र रेड्डीअपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर

दिलीप झळकेअपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहर

जालींदर सुपेकरअपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर

एम. बी. तांबाडेसंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई

विनय कारगांवकरअपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई

मोहित कुमार गर्गरत्नागिरी पोलीस अधीक्षक

विक्रम देशमानेठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

राजेंद्र दाभाडेसिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक

सचिन पाटीलनाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक

मनोज पाटील- अहमदनगर पोलीस अधीक्षक

प्रवीण मुंढेजळगाव पोलीस अधीक्षक

अभिनव देशमुखपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

दिक्षितकुमार गेडामसांगली पोलीस अधीक्षक

शैलेश बलकवडेकोल्हापूर पोलीस अधीक्षक

विनायक देशमुखजालना पोलीस अधीक्षक

राजा रामास्वामीबीड पोलीस अधीक्षक

प्रमोद शेवाळेनांदेड पोलीस अधीक्षक

निखिल पिंगळेलातूर पोलीस अधीक्षक

जयंत मीनापरभणी पोलीस अधीक्षक

राकेश कलासागरहिंगोली पोलीस अधीक्षक

वसंत जाधवभंडारा पोलीस अधीक्षक

प्रशांत होळकरवर्धा पोलीस अधीक्षक

अरविंद साळवेचंद्रपूर पोलीस अधीक्षक

विश्वा पानसरेगोंदिया पोलीस अधीक्षक

अरविंद चावरीयाबुलडाणा पोलीस अधीक्षक

डी. के. पाटील भुजबळयवतमाळ पोलीस अधीक्षक

अंकित गोयलगडचिरोली पोलीस अधीक्षक

 

मागे

एसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना 'हे' नियम अनिवार्य
एसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना 'हे' नियम अनिवार्य

एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली  असूनआ....

अधिक वाचा

पुढे  

अधिक मासातील शुभ मुहूर्त जाणून घ्या
अधिक मासातील शुभ मुहूर्त जाणून घ्या

वाहन खरेदी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 19, 20, 27, 28, 29 तारखेला तर ऑक्टोबरमध्ये 4, 10 आणि 11 य....

Read more